छत्रपती Sambhajinagar, धाराशिव नामांतरावर हायकोर्टाचे शिक्कामोर्तब, आक्षेप घेणाऱ्या याचिका फेटाळल्या! औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आक्षेप घेणाऱ्या विविध याचिका हायकोर्टाने बुधवारी फेटाळून लावल्या. संभाजीनगरकर : औरंगाबाद शहराचे छत्रपती Sambhajinagar आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आक्षेप घेणाऱ्या विविध याचिका हायकोर्टाने बुधवारी फेटाळून लावल्या. शहराच्या नामांतरामुळे कोणाच्याही मूलभूत हक्कांवर गदा येत नाही. तसेच याचिकाकर्त्यांना राज्य सरकारच्या अधिसूचनेला आव्हान देण्याचा हक्क प्राप्त होत नाही, असे स्पष्ट करीत हायकोर्टाने राज्य सरकारचा उस्मानाबाद आणि औरंगाबाद यांचे अनुक्रमे धारशिव आणि छत्रपती संभाजीनगर नामकरण करण्याचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन सदस्यीय मंत्रिमंडळाने दोन वर्षांपूर्वी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्यास मान्यता दिली होती. औरंगाबादबाबत १६ जुलै २०२२ रोजी अधिसूचनाही काढली आणि मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आली. केंद्र सरकारनेही या अधिसूचनेला मंजुरी दिली. त्या विरोधात अॅड. युसूफ मुचाला आणि अॅड. प्रज्ञा तळेकर यांच्यासह सुमारे सहा याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर नियमित सुनावणी झाल्यानंतर खंडपीठाने सुमारे सहा महिन्यांपूर्वी ४ ऑक्टोबर २०२३ रोजी राखून ठेवलेला निर्णय बुधवारी जाहीर करीत सर्व याचिका फेटाळून लावल्या व राज्य सरकारच्या औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब केले. सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार – अॅड. सतिश तळेकर उच्च न्यायालयात महिनाभर नियमित सुनावणी झाल्यानंतर निर्णय याचिकाकर्त्यांच्या बाजून लागेल, अशी अपेक्षा होती. आज न्यायालयाने दिलेला निर्णय हा न पटण्यासारखा आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. यापूर्वी १९९८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा दिला होता, तशाच प्रकारचा न्याय सर्वोच्च न्यायालय देईल, अशी अपेक्षा अॅड. सतिश तळेकर यांनी व्यक्त केली.
नोकऱ्यांच्या चिंतेला मिटवणारा मोठा निर्णय: छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटा प्रकल्प
मराठवाड्यातील विकासाला नव्याने गती देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटीमध्ये मोठा प्रकल्प उभारण्याचे संकेत मिळाले आहेत. टोयोटा किर्लोस्कर मोटर्स (TKM) या प्रकल्पाच्या माध्यमातून २०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. गुंतवणुकीचा बूस्टर डोस शेतकरी आणि लोकांच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने छत्रपती संभाजीनगरसाठी एक मोठा विकासात्मक निर्णय घेतला आहे. ऑरिक सिटीमध्ये उभारला जाणारा हा प्रकल्प मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला गती देईल, तसेच स्थानिक रोजगार संधींमध्ये मोठी वाढ करेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यादरम्यान टोयोटा किर्लोस्कर मोटर्सच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली होती. त्यांनी गुजरात, तमिळनाडू आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या पर्यायांचा विचार केला आणि महाराष्ट्राची निवड केली. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये २०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक निश्चित झाली आहे. प्रकल्पाची वैशिष्ट्ये: – टोयोटा कीर्लोस्कर मोटर्सची मोठी गुंतवणूक: २०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक – जागतिक मानांकन: ऑरिक सिटीमध्ये ग्रीनफिल्ड प्रकल्प – रोजगार निर्मिती: ८,००० रोजगार संधी – आर्थिक चालना: मराठवाड्याच्या अर्थकारणाला गती – प्रकल्प आकार: ८५० एकर क्षेत्रात साकारला जाणार – प्रमुख उपस्थिती: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गुंतवणुकीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “टोयोटा किर्लोस्करच्या या मोठ्या गुंतवणुकीमुळे ८,००० लोकांना थेट रोजगार मिळणार आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला गती मिळेल. कर्नाटकमध्ये देखील त्यांनी राज्याची निवड केली होती, परंतु महाराष्ट्राची निवड करणे हे अत्यंत आनंदाचे आहे.” अधिक माहिती साठी वाचा महाराष्ट्राच्या संभाजीनगरात Toyota Kirloskar Motor (TKM) रु. २५,००० कोटींचा प्रकल्प उभारणार