मराठवाड्यातील विकासाला नव्याने गती देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटीमध्ये मोठा प्रकल्प उभारण्याचे संकेत मिळाले आहेत. टोयोटा किर्लोस्कर मोटर्स (TKM) या प्रकल्पाच्या माध्यमातून २०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
गुंतवणुकीचा बूस्टर डोस
शेतकरी आणि लोकांच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने छत्रपती संभाजीनगरसाठी एक मोठा विकासात्मक निर्णय घेतला आहे. ऑरिक सिटीमध्ये उभारला जाणारा हा प्रकल्प मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला गती देईल, तसेच स्थानिक रोजगार संधींमध्ये मोठी वाढ करेल.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यादरम्यान टोयोटा किर्लोस्कर मोटर्सच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली होती. त्यांनी गुजरात, तमिळनाडू आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या पर्यायांचा विचार केला आणि महाराष्ट्राची निवड केली. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये २०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक निश्चित झाली आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये:
– टोयोटा कीर्लोस्कर मोटर्सची मोठी गुंतवणूक: २०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक – जागतिक मानांकन: ऑरिक सिटीमध्ये ग्रीनफिल्ड प्रकल्प – रोजगार निर्मिती: ८,००० रोजगार संधी – आर्थिक चालना: मराठवाड्याच्या अर्थकारणाला गती – प्रकल्प आकार: ८५० एकर क्षेत्रात साकारला जाणार – प्रमुख उपस्थिती: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती
उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गुंतवणुकीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “टोयोटा किर्लोस्करच्या या मोठ्या गुंतवणुकीमुळे ८,००० लोकांना थेट रोजगार मिळणार आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला गती मिळेल. कर्नाटकमध्ये देखील त्यांनी राज्याची निवड केली होती, परंतु महाराष्ट्राची निवड करणे हे अत्यंत आनंदाचे आहे.”