स्पर्धा परीक्षार्थींचं आंदोलन 2025: छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात सध्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही.”
🔴 विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या:
-
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील अन्याय दुरुस्त करावा:
विद्यार्थ्यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये झालेल्या अन्यायावर संताप व्यक्त केला असून, त्याचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. -
राज्यसेवा मुख्य परीक्षा ४५ दिवस पुढे ढकलावी:
अभ्यासासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. -
कंबाईन भरतीतील जागा वाढवाव्यात:
दोन वर्षांनंतर आलेल्या कंबाईन जाहिरातीत खूपच कमी जागा देण्यात आल्या आहेत. PSI साठी 441 जागांची मागणी होती, पण केवळ 216 जागा देण्यात आल्या, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. -
ACBC व EWS आरक्षणातील गोंधळाची चौकशी करावी:
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील आरक्षणात झालेल्या कथित घोटाळ्याविरोधातही विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
🎙️ विद्यार्थ्यांची भूमिका:
“आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही,” असं स्पष्ट मत आंदोलक विद्यार्थ्यांनी मांडलं. त्यांनी आयोगाच्या निर्णयप्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली असून, भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेची मागणी केली.
🛑 संपूर्ण अपडेटसाठी भेट द्या: www.sambhajinagarkar.com
📲 Follow करा: Instagram, Facebook, WhatsApp Channel @Sambhajinagarkar