Edit Template

छत्रपती संभाजीनगरात स्पर्धा परीक्षार्थींचं ठिय्या आंदोलन; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

स्पर्धा परीक्षार्थींचं आंदोलन 2025: छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात सध्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही.”

 

🔴 विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या:

 

  1. राज्यसेवा मुख्य परीक्षेतील अन्याय दुरुस्त करावा:
    विद्यार्थ्यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये झालेल्या अन्यायावर संताप व्यक्त केला असून, त्याचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.

  2. राज्यसेवा मुख्य परीक्षा ४५ दिवस पुढे ढकलावी:
    अभ्यासासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी ही मागणी करण्यात आली आहे.

  3. कंबाईन भरतीतील जागा वाढवाव्यात:
    दोन वर्षांनंतर आलेल्या कंबाईन जाहिरातीत खूपच कमी जागा देण्यात आल्या आहेत. PSI साठी 441 जागांची मागणी होती, पण केवळ 216 जागा देण्यात आल्या, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

  4. ACBC व EWS आरक्षणातील गोंधळाची चौकशी करावी:
    राज्यसेवा मुख्य परीक्षेतील आरक्षणात झालेल्या कथित घोटाळ्याविरोधातही विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

🎙️ विद्यार्थ्यांची भूमिका:
“आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही,” असं स्पष्ट मत आंदोलक विद्यार्थ्यांनी मांडलं. त्यांनी आयोगाच्या निर्णयप्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली असून, भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेची मागणी केली.


🛑 संपूर्ण अपडेटसाठी भेट द्या: www.sambhajinagarkar.com

📲 Follow करा: Instagram, Facebook, WhatsApp Channel @Sambhajinagarkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular Articles

Business Recent Posts

Wellness Recent Posts

  • All Posts
  • Business
  • Calendar
  • Culture
  • Digital Marketing
  • Editorials
  • Kids Zone
  • Lifestyle
  • Marketing
  • News
  • PRESS RELEASE
  • Sports
  • Study
  • Technology & Business
  • Visa, Immigration & Travel
    •   Back
    • English
    • Hindi
टोयोटा किर्लोस्कर toyota-invests-25000-cr-sambhajinagar

टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) आणि महाराष्ट्र सरकार आज एक महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी करणार आहेत. या करारानुसार, टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM)...

sambhajinagar-toyota-project-20000cr

मराठवाड्यातील विकासाला नव्याने गती देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटीमध्ये मोठा प्रकल्प उभारण्याचे संकेत मिळाले आहेत. टोयोटा किर्लोस्कर मोटर्स (TKM) या...

हायकोर्टाचे शिक्कामोर्तब: छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराच्या निर्णयावर आक्षेप घेणाऱ्या याचिका फेटाळल्या.

छत्रपती Sambhajinagar, धाराशिव नामांतरावर हायकोर्टाचे शिक्कामोर्तब, आक्षेप घेणाऱ्या याचिका फेटाळल्या! औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याच्या...

JSW ग्रीन मोबिलिटीचे ₹27,200 Cr निवेश, 5,200+ रोजगार आणि 6L वाहनांची निर्मिती.

महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे. राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी सात प्रमुख प्रकल्पांना मंजुरी दिली असून, यासाठी एकूण ₹81,000 कोटींची...

संभाजीनगरकर