छत्रपती संभाजीनगर हे केवळ ऐतिहासिक वारसास्थळ आणि सांस्कृतिक वैविध्यतेचे प्रतीक राहिले नसून आता औद्योगिक क्षेत्रात आपली ठसा उमटवत ‘इंडस्ट्रियल मेट्रो’ बनण्याच्या दिशेने विश्वासार्ह वाटचाल करत आहे.
Table of Contents
Toggleऔद्योगिक उत्क्रांतीची सुरुवात
वाळूज, शेंद्रा, बिडकीन आणि ऑरिक सिटीसारख्या औद्योगिक टप्प्यांमुळे शहराची नव्याने ओळख निर्माण झाली आहे. येथे इलेक्ट्रिक वाहन, फार्मास्युटिकल्स, अन्न प्रक्रिया, ऑटो पार्ट्स, ग्रीन टेक्नॉलॉजी, केमिकल्स यासारख्या क्षेत्रात 1 लाख कोटींहून अधिक गुंतवणूक झाली आहे. यामुळे लाखो रोजगार संधी निर्माण झाल्या असून संपूर्ण मराठवाड्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे.
पायाभूत सुविधांची गरज
औद्योगिक वृद्धीसोबत इन्फ्रास्ट्रक्चर सुदृढ करणे अनिवार्य आहे. यात खालील घटकांचा समावेश आहे:
-
रस्ते व लॉजिस्टिक हब
-
वीज आणि जलसंपत्ती व्यवस्थापन
-
स्मार्ट डिजिटल कनेक्टिव्हिटी
-
सार्वजनिक वाहतूक व ई-वाहन चार्जिंग हब
-
जल पुनर्वापर प्रकल्प
-
हरित ऊर्जा हब
-
स्टार्टअप्ससाठी प्रोत्साहन
‘वन सिटी, वन प्लॅन’ ची गरज
शहराच्या एकात्मिक आणि शाश्वत विकासासाठी पुढील 25–30 वर्षांसाठी मास्टर प्लॅन आवश्यक आहे. यात शहरी आणि औद्योगिक विस्तार, वाहतूक, पर्यावरण, शिक्षण, पर्यटन, आरोग्य व कचरा व्यवस्थापन यांचा सुसंगत विचार होणे गरजेचे आहे.
सामूहिक प्रयत्नांची गरज
शासन, MIDC, महापालिका, स्मार्ट सिटी मिशन आणि खासगी क्षेत्र यांच्यातील समन्वय विकासाचा कणा आहे. केवळ पायाभूत सुविधा पुरेशी नाहीत; गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी Single Window Clearance, उद्योग सुलभता, प्रशासकीय पारदर्शकता, सामाजिक सुरक्षितता, आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देणारे धोरण आवश्यक आहे.
डेटा फोकस: छत्रपती संभाजीनगरची औद्योगिक कामगिरी
| इंडिकेटर | स्थान/प्रगती |
|---|---|
| HSN Code (20 वस्तूंची सर्वाधिक निर्यात) | भारतात #1 |
| मका उत्पादन (17% हिस्सा) | महाराष्ट्रात #2 |
| फार्मास्युटिकल्स निर्यात | भारतात #2 |
| वाहन निर्यात | भारतात टॉप 5 मध्ये |
| अब्जाधीशांची संख्या | भारतात #13 |
| GCC उपस्थिती (Global Capability Centers) | भारतात #19 |
| एकूण निर्यात मूल्य (25000 कोटी/वर्ष) | भारतात #27 |
| महाराष्ट्राच्या उत्पादनात योगदान | 25% |
| महाराष्ट्रातील वाहन निर्यातीतील हिस्सा | >33% |
शाश्वततेच्या दिशेने पावले
आज संपूर्ण जगात स्मार्ट, ग्रीन आणि रेसिलियंट सिटीज या संकल्पना फोफावल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर यामध्ये अग्रस्थानी यावं यासाठी काही महत्त्वाचे टप्पे:
-
सौर आणि वाऱ्यावर आधारित हरित ऊर्जा
-
ई-व्हेइकल चार्जिंग पॉइंट्स
-
जलपुनर्वापर व्यवस्था
-
इनर व आउटर रिंग रोड
-
जीआयएस मॅपिंग व डिजिटल गव्हर्नन्स
-
ग्रामीण व उपनगरांशी शहराचे कनेक्शन
-
स्टार्टअप हब व इनोव्हेशन स्पेस
महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण
शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी स्वतंत्र महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (MRDA) ची निर्मिती गरजेची आहे. यामुळे शहराचा नियोजनबद्ध विकास शक्य होईल आणि वित्तीय स्वायत्तता लाभेल.
पुढील दिशा: इंडस्ट्रियल मेट्रोची नवी ओळख
आगामी 5 वर्षांत पुढील गोष्टींची पूर्तता झाल्यास, छत्रपती संभाजीनगर ‘स्मार्ट सिटी’ वरून ‘इंडस्ट्रियल मेट्रो’ होण्याच्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल करेल:
-
एकात्मिक ट्रान्सपोर्ट टर्मिनल
-
डिजिटल सर्व्हिसेससाठी सेंट्रल डेटा प्लॅटफॉर्म
-
हरित व स्मार्ट ऊर्जा व्यवस्था
-
स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट
-
लॉजिस्टिक व एक्स्पोर्ट हब
-
सेवा क्षेत्रात गुंतवणूक
नवउद्योग, MSMEs आणि गुंतवणूकदारांसाठी संदेश
छत्रपती संभाजीनगर हे उद्योजकतेसाठी परिपूर्ण वातावरण असलेले शहर आहे. याठिकाणी स्टार्टअप्ससाठी आवश्यक असलेली बाजारपेठ, मनुष्यबळ, लोकेशन व सरकारी पाठबळ उपलब्ध आहे. त्यामुळे स्थानिक उद्योजकांनी आणि MSMEs ने शहरात अधिकाधिक गुंतवणूक करणे, हे फायद्याचे ठरेल.
स्रोत
या लेखातील माहितीचा मुख्य स्रोत: निखिल भालेराव यांचा फेसबुक पोस्ट
लेख प्रकाशित: Sambhajinagarkar.com – व्यवसाय आणि गुंतवणूक विभाग
लेखक: संपादक मंडळ, Sambhajinagarkar.com
संपर्क: info@sambhajinagarkar.com






















1 Comment
Your comment is awaiting moderation.
I feel tһis is one оf tһe so mucһ impoгtаnt information for me.
And i’m hapρy reading your article. However want to commentary on few general
issues, Τһe site style is wonderful, tһe articles іѕ in point of fact excellent :
D. Excellent job, cheers
mу homepage … обслуживание и ремонт принтеров
Attractive section of content I just stumbled upon your blog and in accession capital to assert that I get actually enjoyed account your blog posts Anyway I will be subscribing to your augment and even I achievement you access consistently fast